शेतकऱ्यांसाठी मोफत वीज
महाराष्ट्र सरकारने शेतकरी तसेच सर्वसामान्य वर्गाकरिता नवनवीन योजना राबवण्याचे धोरण अवलंबलेले पहावयास मिळत आहे. महाराष्ट्र शासनाने वीज क्षेत्रामध्ये मोठा बदल घडवण्याचे धोरण हाती घेतलेले आहे.
वीज ग्राहकांना कमीत कमी वीज बिल व एप्रिल 2024 पासून पाच वर्षासाठी मोफत विज पुरवठा देण्याचा संकल्प करण्याचे धोरण सामोरे आल्याची वार्ता मिळत आहे. जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा सरकारचा ध्यास आहे.
त्यासाठी सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना देखील जाहीर केलेली आहे.
त्याचबरोबर केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूर्या घर योजना पण चालू केलेली आहे. या योजनेमुळे आता ग्राहकांचे वीज बिल झिरो होणार आहे.
येणाऱ्या काळात लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती 18 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकार ने या सौर ऊर्जा करण्याचे काम अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू केलेले आहे, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये मान्याची वाडी या गावांमध्ये 100% सौर ऊर्जाकरण करण्यात आलेले आहे.हा सौर ग्राम सूर्य प्रकल्प मान्याची वाडी येथे झालेला असून त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण याबद्दल आपल्या भाषणात उल्लेख केलेला आहे. ही योजना राबवल्याबद्दल त्या गावचे सरपंच यांनी ऊर्जा मंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
सौर ग्राम मोफत वीज प्रकल्प सातारा जिल्ह्यातील मानेची वाडी या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावचे अभिनंदन केले असून, ही योजना घरगुती व शेतकऱ्यांसाठी खूप मोठे वरदान ठरणार असल्याचे सांगितले आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या अंतर्गत घराच्या छतावर ती सौर ऊर्जा बसवल्यामुळे या लोकांना वीस बिलातून सुटका मिळाल्याची माहिती सामोरे आलेली आहे.
त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील मागेल त्यांना सौर ऊर्जा पंप योजना देण्याची घोषणा केलेली आहे. खुल्या वर्गातील प्रवर्ग तसेच शेतकरी वर्गांना 10 टक्के व अनुसूचित जाती तील वर्गांना 5 टक्के एवढी रक्कम भरून या योजनेच्या लाभ मिळवता येणार आहे. यासाठी लागणारी उर्वरित रक्कम हे शासन अनुदान म्हणून देणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे